(दसाक्षरी)
*_________||व्यथा||________*
कशी गत जीवनाची झाली.?
माझे जसे नशीब फुटले!
दुखाश्रू नद्या वाहे नयनी...
मनी व्यथेचे रान उठले!!.....||१||
केला तू छळ कसा हा देवा?
माझे दैवही कसे लिहिले?
हसावं की, रडावं मी आता!
मनी माझ्या कोंब अंकुरले!!.....||२||
दुःख गिळून गिळून रोज..!
धुंद नशा आसवांची आली!!
आसमंत फाटला हर्षाचा!
भूक पोटाची दुष्मन झाली!!.....||३||
छायेत न मायेत प्रेमाच्या,
असा जन्म नकोच मजला!
कर बंद ठोके हृदयाचे...
जगण्याचा मी मोह सोडला..... ||४||
*©सतिषसिंह मालवे[अमरावती]*
*मोबा.९५२७९१२६२५*
📚🖋👌👍🚩✍🏻💐🙏🏻💐👏🏻